शालेय आवश्यक वस्तू हस्तांतरण सोहळा

। म्हसळा । वार्ताहर ।

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे साहेब यांची प्रेरणा घेऊन म्हसळा हायस्कूल कामकाज करत असताना विद्यालयाचे माजी प्राचार्य यांनी पोस्को या कंपनीला संपर्क साधून गतवर्षी प्रशालेतील गुणवत्ता व भौतिक सुविधा वाढीसाठी येणार्‍या अडचणी समजून दिल्या. यासाठी विद्यमान प्राचार्य डी.आर.पाटील सर यांनी वारंवार संपर्क साधला. याच कार्याची प्रचिती येऊन कार्यास अखेर यश आले. पोस्को व एम डी मोअर्स या कंपनीमार्फत सी एस आर फंडातून प्रशालेला स्मार्ट LED टी.व्ही.-55, वॉटर फिल्टर, वॉटर कुलर, ग्रंथालय कपाट, टेबल, संपूर्ण माईक सिस्टिम, स्पॉट लाईट आणि इतर शैक्षणिक साहित्य प्रशालेस सुपूर्द करण्यात आले. मुंकी चुन या कोरियन पाहुण्यांच्या हस्ते हा साहित्य हस्तांतरण सोहळा पार पडला. या वेळी उपस्थित मान्यवरांचे ढोल व लेझीमच्या गजरात स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी मॅनेजिंग डायरेक्टर मुंकी चुन, डायरेक्टर रोहन्क जैन, अजय शर्मा (मॅनेजर एम डी मोअर्स ), पोस्को मॅनेजर सुधीर भोसले, तरुण उद्योजक एच. पी. गॅस आणि सारा पेट्रोल पंप मालक सईद अहमद कादिरी, प्रविण गुरव, इम्तियाज जुमल, प्रतोष झा, रोहन चव्हाण, दीपक कुमार, भानू प्रताप आणि पोस्को स्टाफ उपस्थित होता. सर्व साहित्य प्राचार्य डी.आर. पाटील यांनी स्वीकारले. कोरियन पाहुण्यांना बापूजींच्या कार्याची माहिती इंग्रजी विषयाचे प्रा. चक्रधर चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.आर. पाटील यांनी केले, सूत्रसंचालन एम.जे. मुंडे यांनी केले व शेवटी आभार डी.सी.आमले यांनी मानले या कार्यक्रमावेळी जे.के. मांजरेकर, ईश्‍वर पाटील, देवगावकर मॅडम, हनुमंत मोरे, दिलीप भायदे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version