| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी शेकाप कामोठचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी गौरव पोरवाल यांनी सांगितले की, आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी जोरदार मोहीम चालू आहे. परंतु, त्याचा काही उपयोग होत नाही. कारण तो कचरा एकाच गाडी मध्ये एकत्र केला जातो. त्यामुळे सुका कचरा आणि ओला कचरा दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे. तसेच, कंपोस्ट बनविण्यासाठी प्रत्येकी 10 सोसायटींमध्ये एका मशीनचे वाटप केले पाहिजे. महानगरपालिकेचे एक सकारात्मक पाऊल समाजाला स्वस्थ बनवू शकतो. तरी लवकरात लवकर ही सेवा सुरु करावी, अशी मागणी पोरवाल यांनी केली आहे. यावेळी गौरव पोरवाल यांच्यासह नितीन पगारे व रमेश गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






