। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन समुद्रकिनार्याचे अतिशय आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात आले असून दि. 3 डिसेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या सुशोभीकरण प्रकल्पाचा फायदा येथील लॉजेस, हॉटेल्स, खाद्य पदार्थ विक्रेते, घोडा गाडीवाले, ऊंटवाले इ. अनेक व्यावसायिकांना झाला आहे. तसेच, या सुशोभीकरणामुळे पुणे-मुंबई व अन्य शहरांकडून पर्यटकांची संख्या वाढली असून पार्कींगसाठी श्रीवर्धनचे रस्ते अपुरे पडू लागले श्रीवर्धन समुद्रकिनार्याचे अतिशय आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात आले त. यामुळे समुद्र किनार्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
समुद्रकिनार्यावरील सुशोभीकरणात खेकडा, मासा व अन्य शिल्प उभारण्यात आले आहेत. ही शिल्पे टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेली आहेत. यांची नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता-देखभाल केली जाते. तरी ही शिल्पे जोरदार पावसामुळे गंजत आहे. ती दीर्घकाळ टिकून रहावीत याकरिता नगर परिषदेने या शिल्पांची रंगरंगोटी किंवा रेड ऑक्साईड वा अन्य गंज रोधक लावून त्यांचे आयुष्य व सौंदर्य वाढवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.