देशाच्या प्रगतीसाठी स्पीड, स्कीलची गरज

मोदी यांचे प्रतिपादन,पुणे मेट्रोचा प्रारंभ
| पुणे | प्रतिनिधी |

देशाच्या विकासासाठी स्पीड आणि स्कीलची गरज असून,आपले सरकार या दोन्ही बाजूंना प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादित केले. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. मोदी यांनी एमआयटी प्रांगणात बोलताना भाषणाची सुरूवात पंतप्रधान मोदीेंनी मराठीतून केल्याने उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याचबरोबर त्यांनी पुणेकरांचे कौतुक केले. मोदी पुढे म्हणाले की, मुळा मुठासह पुण्यातील विकासाला केंद्र सरकार मोठी चालणा देणार आहे. पुणे शहरात नदी वाचवणे गरजेचे आहे.

यासाठी वर्षातून एकदा पुणे शहरातील नागरीकांनी नदी उत्सव साजरा करायला हवा. सध्या देश वेगाने वाढत आहे. पुणे मेट्रो उदघाटन करताना मला आनंद होत आहे की मेट्रोच्या शिलान्यास सोहळा आणि लोकार्पण सोहळा दोन्हीही माझ्या हस्ते होत आहे. यासाठी पीएम गती शक्ती आम्ही देशव्यापी प्लॅन केला आहे. याअंतर्गत आम्ही देशाच्या वाढीस चालणा देणार आहे. भारताच्या प्रत्येक नागरीकाला पीएम गती शक्तीबाबत माहिती करून देत त्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पुण्यातील ग्रामीण भागाला आम्ही पीएम गती शक्ती अंतर्गत प्रोत्साहन देणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस, राष्ट्रवादीला टोले लगावले, यापूर्वी कामाची भूमीपूजने व्हायची, पाट्या लागायच्या पण नंतर त्या पाट्यांचे काय व्हायचे हेच कळत नसे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी नागपूरप्रमाणेच पिंपरी-चिंचवड, ठाणे मेट्रोसाठी केंद्राने प्राधान्य द्यावे,अशी मागणी केली.यासाठी आपण कोणतेही राजकारण करु इच्छित नाही, असे ते म्हणाले.राज्यपालांच्याबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींकडे तक्रार केली.

मोदींचा मेट्रोतून दौरा
उद्धाटनानंतर मोदी यांनी उपस्थितासमवेत मेट्रोमधून प्रवासही केला.त्यासाठी त्यांनी तिकीटही काढले.मेट्रोतून प्रवास करताना त्यांनी विद्यार्थी,विद्यार्थिनींशी संवादही साधला.

Exit mobile version