नीर 11 ताजपूर ठरला शेकाप चषकाचा मानकरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सराई येथे ओम साई क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शेकाप चषक क्रिकेट स्पर्धेत नीर 11 ताजपूर संघाने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेचे उद्घाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला होता. या उद्घाटन सोहळ्यासाठी महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, शेकाप नेते संदीप घरत, अनिल पाटील, दिलीप भोईर,अमित फुंडे, सुधीर चेरकर, प्रकाश खडपे, मोहन धुमाळ, विक्रांत वार्डे, मधुकर काटकर, आंजु मेनन, सुधाकर म्हात्रे, कमळाकर कंठक, राहुल पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेचा अंतिम सामना नीर 11 ताजपुर आणि ओम साई सराई या दोन संघा दरम्यान झाला. त्यात नीर 11 ताजपुर संघाने प्रथम क्रमांक पटाकवला तर ओम साई सराई द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक ओमसाई आंबेपुर संघाला मिळवला. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज योगेश पवार माणगाव याची निवड करण्यात आली. त्याने अंतिम सामन्यात 40 धावा केल्या. स्पर्धेत उत्क्रृष्ट गोलंदाजाचा किताब कुणाल कोंडालकर चणेरा देण्यात आला. त्याने सामन्यात 7 बळी मिळविले. या स्पर्धेत मालिकावीर सागर काटकर ठरला, त्याने 58 धावा आणि 4 विकेट घेतल्या. यास्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

खेळाडूंना प्रोत्साहन द्या-चित्रलेखा पाटील
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सराईसारख्या ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.अशा स्पर्धामधूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि त्यातून कोणीतरी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसारखे क्रिकेटपटू उदयास येतात.त्यामुळे सराई सारख्या ग्रामीण भागातूनही असेच खेळाडू निर्माण व्हावेत,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी महिलांसाठीही क्रिकेट स्पर्धा भरवा, असेही त्यांनी आयोजकांना सुचित केले. शेकाप केवळ राजकारण करीत नाही, तर क्रिकेट, शिक्षण आदी मुलभूत गरजांनाही प्रोत्साहन देत आलेला आहे.रस्त्यांच्या कामासाठी आम्ही आंदोलन केले. त्यामुळे आज या परिसरातील रस्ता बर्‍यापैकी तयार झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. येत्या सहा महिन्यात अलिबागेत भव्य स्पर्धा भरविण्याचेही त्यांनी जाहीर केले.

Exit mobile version