नीरज चोप्राची सुवर्णमय कामगिरी; विश्व स्पर्धेत अजिंक्यपद

| बुडापेस्ट | वृत्तसंस्था |

भारताच्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्णमय कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे. बुडापेस्ट येथे पार पडलेल्या विश्व ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मागे टाकत नीरजने 88. 7 मी लांब भाला फेकून इतिहास रचला आहे. अर्शदनं पहिल्या फेरीत 74.80 मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट 82.18 मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट 87.82 मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं पण हे आव्हान लीलया पेलून नीराज चोप्रा जगज्जेता म्हणून चर्चेत आला आहे.



नीरजला तब्बल 58 लाखाचे रोख पारितोषिक मिळाले आहे. उपविजेता, अर्शद नदीमने तिसऱ्या फेरीत 87. 82 मीटर लांब भाला फेकला होता जे त्याच्या स्वतःच्या रेकॉर्डमधील सर्वाधिक लांबीचे अंतर आहे. यासाठी नदीमने रौप्य पदक जिंकले असून त्याला 29 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (84.77 मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (84.14 मीटर) यांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भालाफेक या क्षेत्रातील भारताचे भविष्यातील चेहरे सुद्धा समोर आले आहेत.

तिरंग्याचा राखला मान
ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर नीरजने तिरंगा सोबत घेत फोटोसाठी पोज दिली. यादरम्यान त्याने पाकिस्तानचा ॲथलीट अर्शद नदीमलाही आपल्यासोबत फोटोसाठी बोलावलं याचे देखील सर्वत्र खूप कौतुक झालं. यानंतर आता नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेला आदर चर्चेचा विषय ठरला आहे. विजयानंतर नंतर हंगेरियनची एक महिला चाहती त्याच्याकडे आली. या महिलेने महिलेने हिंदीतून नीरजला ऑटोग्राफ मागितला. नीरजने लगेच होकार दिला, पण जेव्हा महिला चाहतीने ऑटोग्राफसाठी तिरंगा हातात धरला तेव्हा मात्र नीरजने भारतीय ध्वजावर सही करण्यास नकार दिला. त्याएवजी नीरजने त्या महिलेच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. नीरजने तिरंग्याबद्दल दाखवलेल्या आदराने सर्वांची मनं जिंकली.

प्रतिभावान नीरज हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कटता त्याला केवळ थलेटिक्समध्येच चॅम्पियन बनवत नाही, तर संपूर्ण क्रीडा जगतात अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक बनवते. जागतिक थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.

नरेंद्र मोदी,पंतप्रधान
Exit mobile version