लॉरेओ पुरस्कारासाठी नीरजला नामांकन

। लंडन । वृत्तसंस्था ।
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला बुधवारी प्रतिष्ठेच्या लॉरेओ जागतिक लक्षवेधी कामगिरी पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज हा पहिलाच भारतीय क्रीडापटू ठरला. जागतिक लक्षवेधी कामगिरीफ या पुरस्कारासाठी नीरजसह रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एमा रॅडूकानू, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू प्रेडी, तिहेरी उडीपटू युलिमर रोहास आणि जलतरणपटू अरिअर्ने टिटमस हे खेळाडू शर्यतीत आहेत. विजेत्यांच्या नावांची एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल.

Exit mobile version