भालाफेकीत भारताचा बोलबाला

नीरजला सुवर्ण, तर किशोर जेनाला रौप्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अकराव्या दिवशी भारतीय भालापेकपटूंनी शानदार कामगिरी केली. भालाफेक स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने सुवर्णपदक तर किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताचा अनुभवी खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या 78 झाली आहे. त्याचबरोबर भारताचे हे 17 वे सुवर्णपदक आहे. वास्तविक, जेना किशोरने नीरज चोप्राला तगडी स्पर्धा दिली. एकेकाळी नीरज चोप्रा जेना किशोरच्या मागे पडला होता, पण त्यानंतर नीरज चोप्राने जबरदस्त पुनरागमन केले. विशेषत: नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात 88.88 मीटर फेक केली. जेना किशोरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे भालाफेकमधील सुवर्णपदक आणि रौप्यपदक दोन्ही भारताच्या वाट्याला गेले.

Exit mobile version