नीरजचं ऑलिम्पिक तिकीट पक्कं

नवी दिल्ली : भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भालाफेक करत जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी किमान 85.50 मीटर आवश्यक आहे आणि नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतर पार केले. 2024मध्ये पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11ऑगस्टदरम्यान होणार आहे.

Exit mobile version