नीट परीक्षेचा निकाल जाहीर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी दुपारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा अर्थात नीट युजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला शनिवार, दि. 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी पाच मिनिटं आधी एनटीएकडून नीट यूजीचा निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नीट परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येण्यासाठी शहरनिहाय आणि केंद्रनिहाय स्तरावर या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

Exit mobile version