| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्टाच्या 9 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रामायणातील निवडक प्रसंगावर आधारित नीत नूतन रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.26) सायंकाळी 5.30 वाजता नवीन पनवेलच्या सिडको गार्डन, सेक्टर 11, (सिनेराज सिनेमा जवळ) येथे हा कार्यक्रम होणार असून प्रभू रामचंद्रांची विविध रूपे, नाट्यपदे आणि गीतांचा सुरेल आविष्कार सुप्रसिद्ध गायिका वेदश्री खाडिलकर- ओक आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्य-चित्रपट अभिनेत्री निवेदिका डॉ. समीरा गुजर-जोशी करणार आहेत. हा कार्यक्रम निशुल्क असून अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आचार्य अत्रे कट्टा संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.