। रसायनी । वार्ताहर ।
राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेली प्रवेश परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल हि परिक्षा पुन्हा घेण्यात यावी. या प्रमुख मागणीसह रायगड जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष निखिल डवळे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात रायगडात आंदोलन करण्यात आले. यावेळी उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत, उपाध्यक्ष लंकेश ठाकुर, खालापूर तालुका अध्यक्ष निलेश ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य अदित्य घरत, जिल्हाध्यक्ष कुणाल जाधव, प्रदेश सचिव शयान उस्मानी, सरचिटणीस अश्विथ थळी, बूथ अध्यक्ष सुजित पाटिल व युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.