| मुरूड । प्रतिनिधी ।
एकदरा पुलाच्या पहिल्या खांबांचा प्ल्यास्टर निखळून पडले असून आतील स्टिल सडलेल दिसत आहे. पुलाचे कठडे निखलुन पडत आहेत. तरी बांधकाम खाते दुर्लक्ष करीत पुल मजबूत असल्याचा निर्वाळा देत आहे. एकदरा पुल सुमारे 65 वर्षांपूर्वी बांधला आहे. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत आहे. सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यावेळी या पुलावर रहदारी वाढत असते. एकदरा, डोंगरी, माझेरी, आगरदांडा व राजपुरी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुर्वी या पुलाची डागडुजी केली जात होती. परंतु आज सुमारे 30 वर्षांत या पुलाची डागडुजी झालेली नाही. पुर्णपणे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे पुल ढासळत आहेत. तरी बांधकाम खात्याने त्वरित लक्ष देऊन पुलाची डागडुजी करावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.