मुरुडमध्ये महावितरणाचा हलगर्जीपणा

स्विच बॉक्सचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर
मुरुड शहरातील विश्रामधाम समोर विद्युत रोहित्रचे फ्युज बॉक्स असून गेल्या अनेक दिवसापासून या बॉक्सचा दरवाजा तुटलेला असून त्यामुळे पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या बॉक्सला तातडीने दरवाजा बसवावा अशी मागणी करण्यात येत आहे. मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे शनिवार, रविवार व सुट्टीच्या अन्य दिवशी खूप मोठी गर्दी असते.पर्यटकांच्या सोबत लहान मुले सुद्धा असतात. विश्रामधाम येथे लहान मुलांना खेळण्यासाठी मुरुड नगरपरिषदेने विविध खेळणी ठेवली असून स्थानिक मुले सुद्धा विश्रामधाम येथे खेळण्यासाठी येत असतात. विश्राम धामच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताच अगदी समोरच हे विद्युत रोहित्रचा बॉक्स असून सदरचा बॉक्स उघडा असल्याने व्यक्ती अथवा मुलाचा स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यासाठी मुरुड महावितरणाने तातडीने दरवाजा बसवावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.

Exit mobile version