चालकाचा निष्काळजीपणा ठरतोय अपघाताला आमंत्रण

| कोर्लई | वार्ताहर |
रस्त्याच्या दुरवस्थेकडे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत काही वाहन चालक बिनदिक्कतपणे वाहन चालवित असल्याने आज अपघाताचे प्रमाण वाढत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाकडून दखल घेण्यात येऊन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेचे मुरुड तालुका सरचिटणीस विघ्नेश सुर्वे यांनी केली आहे. चालकांना आळा बसणे गरजेचे आहे, असेही सुर्वे यांनी म्हटले आहे.

नुकताच साळाव-मुरुड रस्त्यावर नांदगावच्या बाजारपेठ आरडीसीसी बँक लगत रस्त्याच्या कडेला असलेल्या टोयाटो इनोव्हा गाडीला एसटी बस थोडक्यात घासून गेल्याने पुढील अनर्थ टळला. असे प्रकार टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी विघ्नेश सुर्वे यांनी केली आहे.

Exit mobile version