नेहा कातकरीचा सन्मान

| रसायनी | वार्ताहर |

नेहा बळाराम कातकरी हिने बारावी वाणिज्य शाखेत परिसरात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. दुर्गम भागातील गरीबीची झळ सोसत नेहाने कष्टाचे चीज केले आहे. नेहाच्या यशाबद्दल तिचे पाताळगंगा येथील कोकुयो कॅमलीन कंपनीचे वरिष्ठ जनरल मॅनेजर दिपक कापसे यांच्या हस्ते शालेय उपयोगी किट संच देऊन तिला गौरविण्यात आले.

यावेळी अकाऊंट विभागाचे सचिन सावंत, धनेश पाटील, रुपेश ठाकूर, उत्पादन विभागाचे शंतनू भालगे, निखिल कुलकर्णी, धनंजय ठाकूर, प्रतीक साहू, परचेस विभाग दर्शन माळी, अमर भोसले, स्टोअर विभागाचे गणेश ओव्हाळ, एचआर विभागाचे प्रसाद खैरे, महेश पाटील, सुरक्षा विभागाचे प्रज्योत डाके आदी उपस्थित होते.

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चावणे येथील बारावीचा वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी नेहा कातकरी हिने मेहनतीचे चीज केले असून, तिच्यावर रसायनी पाताळगंगा परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नेहाने रोज येता-जाता आठ कि.मी. पायी प्रवास करुन चावणे येथील शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

Exit mobile version