क्रिकेट स्पर्धेत नेहुली-खंडाळा ठरला विजेता

। खारेपाट । वार्ताहर ।
सिद्धेश स्पोर्टस् मांडवखार आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहुली-खंडाळा संघाने पटकाविला. तर द्वितीय मांडवखार संघ व तृतीय क्रमांक श्रीगाव संघाने पटकाविला. तसेच स्पर्धेत मॅन ऑफ दी मॅच, उत्कृष्ठ बॉलर, उत्कृष्ठ बॅटस्मन यांनाही परितोषिक देण्यात आले. सदर स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील 24 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अमित नाईक, माजी सरपंच राजाराम गावंड, चित्रपट निर्माता संतोष अंबाडे, महेश पाटील, सुधीर म्हात्रे, प्रसाद मोकल, विज्ञान मोकल, ऋषिकेश म्हात्रे, सुयश भुरे, मोन्या चंदने, व इतर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्युत क्रिडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शंकर मोकल व सिद्धेश मोकल व मंडळातील सर्व खेळाडूंचे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version