नेपाळ विमान दुर्घटना: विमान धावपट्टीवर कोसळून ३२ जणांचा मृत्यू

| नेपाळ । वृत्तसंस्था ।

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यति एअरलाइन्सचं हे विमान होतं. नेपाळच्या पोखरा येथे विमान लँडिंग करत असताना डोंगराला जाऊन आदळलं, त्यानंतर हे विमान सेती नदीत कोसळलं आणि विमानाने प्रचंड पेट घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं आहे. विमानातून 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर असे एकूण 72 प्रवासी प्रवास करत आहेत. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच सर्व एजन्सींना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच पोलीस, विमान प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनीही मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने तूर्तास एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Exit mobile version