नेरळ बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नेरळ इंडियन विजयी


। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळमध्ये बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. 32 व्यवसायिक संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतचे विजेतेपद नेरळ इंडियन्स या संघाने जिंकले असून या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्षे आहे.
नेरळ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग येथील परदेशी मैदानावर आयोजित केली होती. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 50 हजाराचे तर उपविजेत्या संघाला रोख 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याने स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला होता. नेरळ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कुणाल गुप्ता, संदेश पाटील, योगेश गायकवाड, हृषिकेश कदम, मोनू गवळे, संकेत घोलप, अनिकेत जाधव, निखिल खरात, तम्मा वाल्मिकी, मंगेश ऐनकर, विशाल आव्हाड, सिद्धेश दहिवलीकर आदी आयोजक कमिटीने केले होते.
स्पर्धेचा अंतिम सामना दर्शन मोडक यांच्या दर्शू इलेव्हन आणि तन्वीर शेख-मुस्तफा तांबोळी यांच्या नेरळ इंडियन्स या दोन संघांमध्ये झाला.त्यात नेरळ इंडियन्स संघाने बाजी मारली आणि नेरळ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक डी.ए.कॅपिटल या दिनेश आढाव यांच्या संघाने पटकावले. तर विशाल आव्हाड यांच्या नेरळ चॅलेंजर संघाला चौथ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज भूषण गवळे, उत्कृष्ट गोविंदाज अबरार शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिषेक जाधव आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक कौष्टुभ टिल्लू यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version