नेरळ-जिते गावाला अवकाळीचा फटका

शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान ; पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडाले

| नेरळ | प्रतिनिधी |

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नेरळ जवळील जिते गावातील 40हून अधिक शेतकऱ्यांच्या घरांचे वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. तर तेथील पोल्ट्री फॉर्मवरील पत्रे उडून गेल्याने 500 कोंबड्यांचे पिल्लांचा मृत्यू झाला आहे. जिते आदिवासीवाडीमधील एका आदिवासी शेतकऱ्याचे घर पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून एका आदिवासी शेतकऱ्याच्या अंगावर वाऱ्याने उडून गेलेले पत्रे कोसळल्याने शेतकरी जखमी झाला आहे. नेरळ जवळील जिते गावातील घरांवरील कौले आणि पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे आदिवासीवाडीमधील ग्रामस्थ नामदेव पवार या आदिवासी ग्रामस्थाच्या घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्याच्या घराच्या छतावरील सर्व पत्रे उडून गेले असून संपूर्ण घराची नासधुस झाली आहे. किराणा साहित्य आणि कपडे अवकाळी पावसाने भिजून गेले आहेत. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. नरेश जाधव यांच्या पोल्ट्री फॉर्मचे मोठे नुकसान झाले आहे. पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्याने कोंबडीची पिल्ले यांचा तडफडून मृत्यु झाला आहे.


जिते आणि कुंभे येथील घरांचे वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. तेथील 30हून अधिक घरांचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या घरांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे महसूल खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या घरांचे कौले तसेच पत्रे उडण्याची या दोन्ही गावांमधील सर्वात मोठी घटना आहे. तेथील रुपेश जाधव, रामचंद्र वळवे, मंगळ मिरकुटे, काळुराम मिरकुटे, रवी हिलम, अनिल भोईर, नवनाथ भोईर, भरत भोईर, संदीप मोरे, राजाराम पवार, गौरू मोरे, दत्ता भोईर, नितीन पदारे, नंदू पदारे, गौतम म्हसे, बाळू मिरकुटे, अंकुश मिरकुटे, जगन्नाथ भोईर, बंडू म्हसकर, किंकावन मोरे, तानाजी मोरे, यशवंत म्हसकर, हनुमान मोरे, भगवान जाधव, नामदेव पवार, जिजा पवार, लक्ष्मण हिलम, हिरामण पवार, जनाबाई वाघमारे, मंगेश हजारे, नरेश जाधव, कांताबाई बोराडे, रोहित बोराडे, भगवान मोटे, वसंत म्हसकर, पुंडलिक म्हसकर, कमलाकर जाधव आदी ग्रामस्थांच्या घरांचे वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. या नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले जात असताना महसूल विभागाचे तलाठी यांच्या मदतीला स्थानिक ग्रामपंचायत सरपंच रोहिणी मिरकुटे यादेखील हजर होत्या. त्यांनी महसूल विभागाकडे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version