। मुंबई । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्डच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सलग तीन दिवस विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक 22,23 आणि 24 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घेण्यात येणार असून, कामावर दुसऱ्या पाळीत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होतील. तर, नेरळ- खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी आणि पायाभूत कामासाठी सोमवार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12.25 ते 1.55 दरम्यान कर्जत यार्डसह अप मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कर्जत- खोपोली स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध होणार नाही.
डाऊन लोकल रद्द
दुपारी 1.15 वाजता कर्जत-खोपोली लोकल रद्द असेल.
अप लोकल रद्द
दुपारी 12.40 वाजता खोपोली-कर्जत लोकल रद्द असेल.
डाऊन लोकल अंशत: रद्द
दुपारी 12.20 वाजता सीएसएमटी- खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येईल. ही लोकल कर्जत- खोपोलीदरम्यान धावणार नाही.
अप लोकल अंशत: रद्द दुपारी 4.30 वाजता खोपोली - सीएसएमटी लोकल खोपोलीऐवजी कर्जत येथून नियोजित वेळेनुसार सुटेल. खोपोली - कर्जतदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. कर्जत यार्डसह अप आणि मध्य रेल्वे मार्गावर मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.50 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोइम्बतूर -एलटीटी एक्स्प्रेस आणि पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस कर्जत- पनवेलमार्गे वळवण्यात येईल. चेन्नई- एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस कर्जत येथे दुपारी 1.43 ते दुपारी 1.50 दरम्यान थांबवण्यात येईल. ब्लॉक काळात नेरळ- खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
डाऊन लोकल रद्द
दुपारी 12 आणि दुपारी 1.15 वाजता कर्जत येथून खोपोली जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील.
अप लोकल रद्द
सकाळी 11.20 आणि दुपारी 12.40 वाजता खोपोली येथून कर्जत जाणारी लोकल रद्द करण्यात येईल.
डाऊन लोकल अंशत: रद्द
सकाळी 9.30 ते सकाळी 11.14 दरम्यान सुटणाऱ्या सीएसएमटी - कर्जत लोकल; तसेच दुपारी 12.05 वाजता ठाणे - कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येईल आणि अंशत: रद्द केल्या जातील. या लोकल नेरळ -कर्जत दरम्यान धावणार नाहीत.
अप लोकल अंशत: रद्द
सकाळी 11.19 ते 1 दरम्यांची कर्जत - सीएसएमटी लोकल, तसेच दुपारी 1.27 ची कर्जत-ठाणे लोकल कर्जतऐवजी नेरळ येथून तिच्या नियोजित वेळेनुसार सुटेल. कर्जत - नेरळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
कर्जत येथील अप, डाऊन, मध्य मार्गावर बुधवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.20 आणि दुपारी1.20 ते दुपारी 3.20 पर्यंत ब्लॉक असेल. कोइम्बतूर- एलटीटी एक्स्प्रेस सकाळी 11.30 ते दुपारी 1.05 पर्यंत लोणावळा येथे थांबवण्यात येईल. चेन्नई- एलटीटी एक्स्प्रेस आणि चेन्नई -एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस पुणे विभागात थांबवण्यात येईल आणि दुपारी 1.10 वाजता लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. ब्लॉक कालावधीत नेरळ - खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.







