| नेरळ । प्रतिनिधी ।
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सध्या पर्यटक आणि प्रवासी यांच्या प्रतीक्षेत आहे. आज मिनीट्रेनच्या दुसर्या गाडीने केवळ सात प्रवासी नेरळ येथून माथेरानकडे रवाना झाले. सकाळची पहिली गाडीदेखील अर्धी रिकामीच होती.
नेरळ -माथेरान- नेरळ ही शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेली पर्वतीय मिनीट्रेन पर्यटक प्रवाशांची लाडकी ट्रेन समजली जाते. या ट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी पर्यटक बहुसंख्येने नेरळ आणि माथेरान स्थानकात थांबून राहतात. त्यात अबालवृध्दांपासून बहुसंख्य पर्यटक यांची मिनीट्रेन लाडकी असल्याने प्रवाशांची कायम गर्दी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी असते. मात्र सध्या एप्रिल महिना सुरू झाला असून लहान मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यात दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांच्यादेखील परीक्षा संपल्या असून शनिवार आणि रविवार वगळता माथेरानमध्ये पर्यटकांची वानवा दिसून येत आहे. पर्यटक कितीही कमी संख्येने असलेतरी माथेरानला जाणारी मिनीट्रेन ही पर्यटकांनी भरून जाते.मात्र यावेळी एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस मिनीट्रेन नेरळ येथून माथेरान येथे जाताना आणि माथेरानवरून नेरळ येथे येताना अर्ध्याहून अधिक रिकामीच जात असते.
आज 8 एप्रिल असूनदेखील माथेरानमध्ये जाणारे पर्यटक रोडावले असल्याचे दिसून येत आहे. नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेनमधून प्रवास करता यावा म्हणून नेरळ येथील तिकीट खिडकीवर गर्दी असते. मात्र आज सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी माथेरानसाठी निघालेली मिनीट्रेन अर्धी रिकामी होती. त्या गाडीचे प्रथम श्रेणीमधील सर्व सिट झाली होत्या. त्याहून भयानक परिस्थिती नेरळ येथून माथेरान जाणार्या दुसर्या प्रवासी गाडीची होती. या गाडीचे पाच प्रवासी डब्यातून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या केवळ सात होती. सर्व प्रवासी डी 1 प्रवासी डब्यातून प्रवास करीत असल्याने अन्य सर्व प्रवासी डब्बे रिकामे होते. केवळ सात प्रवाशांना घेवून नेरळ-माथेरान- नेरळ मिनीट्रेनने आज प्रवास केला. पर्यटकांच्या लाडक्या समजल्या जाणार्या मिनीट्रेनमधून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या रोडावली असल्याने रेल्वे प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.