नेरळ: विविध कार्यकारी सेवा संस्थेवरील वर्चस्वासाठी शेकाप सज्ज

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ विविध कार्यकारी सेवा संस्थेची सार्वत्रिक निवडणूक 12 मार्च रोजी होत असून पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष या सेवा संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. 875 मतदार असलेल्या नेरळ सोसायटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 13 पैकी 10 सदस्य होते. तर शेकापच्या आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक सदस्य विजयी झाला होता.
आर्थिक उलाढाल असलेल्या आणि नेरळ परिसरातील 11 ग्रामपंचायतमधील शेतकरी यांचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या नेरळ ससायटीमध्ये सभासद आहेत. दरवर्षी तीन ते चार कोटींचे खरीप हंगाम कर्ज वाटप करणार्‍या या सोसायटीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नेरळ विविध कार्यकारी सोसायटी मध्ये 13 सदस्य संचालक असून सध्याच्या सदस्य मंडळावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. या सोसायटीमध्ये 1073 सदस्य असून त्यातील 198 सदस्स्यांनी कर्ज घेतले असून त्याची परतफेड केली नाही आणि त्यामुले त्यांची नाव मतदार म्हणून बाद झाली आहेत. 12 मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी 875 मतदार असून या सर्व मतदारांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. सेवा संस्थेच्या 13 जागांसाठी निवडणूक होत असून मागील वेळी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षातील काही नाराजांनी वेगळ्या पॅनल च्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. तरीदेखील शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडणूक आले होते. त्यात शेतकरी कामगार पक्षाने सहकारमध्ये निवडणूक नको राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तीन सदस्यांना आपल्या पॅनलमध्ये सामावून घेतले होते.
सद्याच्या सदस्य मंडळात शेकापचे 10 आणि राष्ट्रवादी चे दोन तसेच शिवसेनाच एक सदस्य होता.आता शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा आपल्या सर्व सदस्य यांच्या विश्‍वासाचे जोरावर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.त्याचवेळी सहकार मध्ये पक्षीय निवडणूक नको असा शेकापच्या नेत्यांचा इरादा असून विरोधकांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याने शेकाप बघ्याची भूमिका घेणार नाही असे निर्देश शेकापच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी दिले आहेत. त्यादृष्टीने शेकापने आपल्या शेतकरी सभासद यांना विश्‍वासात घेणाया सुरुवात केली आहे. यावेळी नेरळ सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार हे लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे र्वर्चस्व असलेल्या नेरळ सोअसायटी मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने नियोजन केले आहे.

Exit mobile version