नेरळ गाव बॅनरमुक्त

ग्रामपंचायतीने जुने फलक काढून टाकले

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावात झेंडा लावण्याच्या आणि काढण्याच्या वादातून गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांच्या शांतता कमिटीच्या बैठकीत बाजारपेठेत आणि अन्यत्र लावण्यात आलेले जुने फलक आणि झेंडे काढून टाकण्याची सूचना नेरळ ग्रामपंचायतीला करण्यात आली होती. दरम्यान, विजेच्या खांबावरील जाहिरात फलक काढण्यात आल्याने नेरळ गाव बॅनरमुक्त बनला आहे.

प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीतनंतर नेरळ पोलीस ठाण्यात झेंड्याच्या वादातून गुन्हा दाखल झाला होता. हा मुद्दा नेरळ पोलीस ठाण्याच्या वतीने 24 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला होता. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी गेली अनेक महिने बाजारपेठेतील खांबांवर लावलेले बॅनर आणि झेंडे काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीतील निर्णयानुसार नेरळ ग्रामपंचायतला सूचित करण्यात आले होते. नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करताना बाजारपेठ भागातील विजेच्या खांबावर अनधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरात फलक आणि झेंडे काढून टाकले.

Exit mobile version