नेरळची दक्षता डुकरे शिष्यवृत्ती परीक्षेत पहिली

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील विद्या विकास शाळेची दक्षता संतोष डुकरे हि विद्यार्थिनी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षात रायगड जिल्ह्यात प्रथम आली आहे. ग्रामीण आदिवासी गटातून मानसी शीद ही 51. 67 टक्के गुण मिळवून आणि भूमिहीन व्यक्तीचा मुलगा असलेला अथर्व मोहिते हा विशेष गटात 50. 33 टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. कर्जत तालुक्यातील पूर्व प्राथमिक मधून 15 विद्यार्थ्यांना तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. परीक्षा मंडळ पुणे यांच्याकडून फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेली पाचवी आणि आठवी मधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांमधून मानांकन निश्‍चित करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात 15 विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक गटातून जिल्ह्यातही शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर आठवीच्या पूर्व उच्च माध्यमिक गटातून जल्ह्यातून 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तालुक्यातील नेरळ येथील विद्या विकास शाळची विद्यार्थ्यीनी असलेली दक्षता संतोष डुकरे हि 80. 66 टक्के गुण मिळवून सर्वसाधारण ग्रामीण मधून जिल्ह्यात पहिली आली आहे. दक्षता डुकरे हि पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देखील 82 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली होती. त्याबद्दल दक्षता डुकरे हिचे कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौन्ड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्या विकास शाळेमध्ये देखील मुख्याध्यापिका निकम यांच्या हस्ते आणि शिक्षकांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये कर्जत तालुक्यातून अथर्व रवींद्र इथापे – 82 टक्के- जिल्ह्यात चौथा, यश आबासाहेब बेडकुटे – 81. 33 टक्के जिल्ह्यात सहावा तसेच मधुरा गणपत धांधारे – 72 टक्के, अथर्व राजीव खारखंतटे – 72 टक्के, मानस ललित जगताप – 68 टक्के, संस्कृती नितीन थोरात – 66. 33 टक्के, निखिलेश विजय वेंगुर्लेकर – 65. 33 टक्के, ओम संदीप देवरे – 62. 66 टक्के, सोहम किशोर पोखरकर -58. 60 यांना ग्रामीण गटातून शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. तर शहरी गटातून राजवर्धन संभाजी यादव-69. 33टक्के, वेशोर्या प्रतुल म्हात्रे -67. 33 टक्के, वेदांत सुनील पवार – 67. 33 टक्के, शर्वरी ऋषिकेश रानडे – 59. 33 टक्के, सिद्धांत जयेश भालेराव – 58. 66 टक्के, आर्या होडाडे – 57. 33 टक्के गुण मिळवून पात्र ठरले आहेत.

पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गटामध्ये मध्ये दक्षता संतोष डुकरे हि 80. 66 टक्के गन मिळवून जिल्ह्यात पहिली तर मार्मम मोमीन ही उर्दू माध्यमाची विद्यार्थिनी 69. 33 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी आली आहे. तर ग्रामीण सर्वसाधारण गटातून शुभम सुरेश वाघमोडे – 59. 33 टक्के, गोमती कुंजर – 58. 38 टक्के, परेश पंडित देशमुख – 55. 03 टक्के, महिमा सुरेश आवाड – 54. 36 टक्के, संचित त्रिशरण कांबळे – 51. टक्के गुण मिळवून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. तर शहरी गटातून हर्षवर्धन संभाजी यादव 72.66 टक्के गन मिळवून जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावला असून आर्या अक्षय मांजरेकर – 64. 42 टक्के, चिरन्जीवी राकेश शेट्टी – 63.08 टक्के आणि वैदेही नितीन थळे – 56. 37 टक्के गुण मिळवून शिसायवृत्ती मिळविली आहे. ग्रामीण आदिवासी गटामध्ये मानसी प्रल्हाद शीद – 51. 67 टक्के, स्वराज आनंद सोनावले – 51 . 0067 टक्के आणि अनुराधा आनंद कुशवाह 51. 0067 यांनी जिल्ह्यातील पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. तर ग्रामीण अनुसूचित तनिष्का अविनाश गवई 46.9 टक्के मिळवून आणि भूमिहीन व्यक्तीचा मुलगा असलेला अथर्व अनंत मोहिते याने 50. 33 टक्के गुण मिळवून विशेष गटात जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

Exit mobile version