नेदरलँडने शेवट केला गोड

| मुंबई । वृत्तसंस्था ।

नेदरलँडने टी-20 वर्ल्डकप 2022 मधील आपली मोहिम विजयाने संपवली. नेदरलँडने झुंजार झिम्बाब्वेचा 5 विकेट्स राखून पराभव केला. याचबरोबर झिम्बाब्वेचे देखील स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. झिम्बाब्वेने पाकिस्तानविरूद्ध शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला होता. मात्र त्याचा वर्ल्डकपमधील प्रवास हा पराभवाने संपला.

नेदरलँडकडून मॅक्स ओडोव्हडने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करणार्‍या झिम्बाब्वेला नेदरलँडने 117 धावात गुंडाळले. नेदरलँडकडून वॅन मीकेरेनने सर्वाधिक 3 तर लीड्स, बीक आणि ग्लोव्हेर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतला. झिम्बाब्वेकडून अष्टपैलू सिकंदर रझाने 24 चेंडूत झुंजार 40 धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या झिम्बाब्वेची अवस्था मीकेरेन आणि ग्लेव्हेर यांनी 3 बाद 20 धावा अशी केली होती. त्यानंतर सेन विलियम्स आणि सिकंदर रझा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी मिकेरेनने फोडली. त्याने विलियम्सला 28 धावांवर बाद केले.

यानंतर सिकंदर रझाने 24 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 40 धावा ठोकल्या. त्याने संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. मात्र लीड्सने त्याची खेळी 15 व्या षटकात संपवली. यानंतर नेदरलँडच्या गोलंदाजांनी उरले सुरल्या झिम्बाब्वे संघाला फारशी वळवळ न करू देता त्यांचा डाव 19.2 षटकात 117 धावात संपुष्टात आणला.

Exit mobile version