विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
महिला अत्याचाराला आळा बसणार
मुंबई | प्रतिनिधी |
महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे आता महिल्यांवर होणार्या अत्याचाराला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बलात्कार, अॅसिड हल्ला आणि समाजमाध्यमांमधून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करुन बदनामी करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता हे विधेयक राज्यपालांकडे पाठवलं जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल.
राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसवा, यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्ती समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीकडून अभ्यास आणि तज्ज्ञांचं मत जाणून घेत योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे या शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणले गेले आहे.
कायद्यातल्या मुख्य तरतुदी
बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला
मृत्यूदंड किंवा सश्रम कारावास
गुन्हा नोदींनंतर
30 दिवसांच्या आत तपास
न्यायालयीन चौकशी 30 दिवसात
अॅसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांविरोधात विशेष तरतूद
कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणूनही तरतूद
