नवं वर्ष, नवं मिशन! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इस्रो’नं रचला इतिहास

‘कृष्णविवर’चे उलगडणार रहस्य

। श्रीहरीकोटा । वृत्तसंस्था ।

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक कमाल केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वकांक्षी मोहीम सुरु केलं आहे. इस्रो अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनला आहे. मागीलवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल उमटवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता. आता पुन्हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. इस्रोनं आज श्रीहरिकोटा येथून आपली पहिली कृष्णविवर मोहीम सुरु केली आहे. इस्रोनं या मिशनची सुरुवात सन 2017 मध्येच केली होती. या मिशनसाठी 9.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे. लाँचिंगच्या जवळपास 22 मिनिटांनंतर एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाईट आपल्या निर्धारित कक्षेत तैनात होईल. पोलीक्स आणि एक्सपेक्ट या सॅटेलाईट्सला दोन पेलोड्स आहेत.

हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार आहे. आज सकाळी 9.10 वाजता हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यावेळी सर्व मोठे शास्त्रज्ञ उपस्थित होते. इस्रोनं सोमवारी (दि.01) 2024 च्या पहिल्या अंतराळ मोहिमेमध्ये एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. भारतीय अंतराळ एजन्सीच्यापूर्वी (इस्रो) यूएस स्पेस एजन्सी (नासा) ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोनं सांगितलं की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे. या संदर्भात एक्स-रे पोलारिमीटर मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजाणार आहे. भारतीय अंतराळ विभागाच्या चांद्रयान-3 आणि आदित्य एल1 मोहिमेनंतर, देशाच्या अंतराळ संशोधनाच्या दिशेनं हे पुढचे ऐतिहासिक पाऊल असणार आहे.

कृष्णविवरचं रहस्य उलगडणार
एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट क्ष-किरण स्त्रोताचं रहस्य उलगडण्यास आणि कृष्ण विवरच्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा स्पेस एजन्सीचा पहिला समर्पित वैज्ञानिक उपग्रह असणार आहे. ब्रह्मांडातील सर्वाधिक चमकणाऱ्या 50 स्त्रोतांचा अभ्यास या उपग्रहाद्वारे करण्यात येणार आहे. पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बाइनरी, अ‍ॅक्टीव्ह गॅलेक्टीक न्यूक्लियाई, नॉन-थर्मल सुपरनोवा इत्यादींचा अभ्यास या उपग्रहाद्वारे करण्यात येईल. या सॅटेलाइटला 650 किमी ऊंचीवर ठेवलं जाणार आहे.
10 उपग्रह घेऊन झेपावणार
ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी वाहन डी1 मिशनच्या यशानंतर हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. या प्रक्षेपणांच आयुष्य सुमारे 5 वर्षे असेल. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही)-सी58 रॉकेट त्याच्या 60 व्या मोहिमेवर, मुख्य पेलोड एक्स-रे पोलारिमीटर आणि 10 इतर उपग्रह घेऊन जाणार आहे. ते पृथ्वीच्या खालील कक्षेत ठेवले जातील.
Exit mobile version