नवोदित युवा क्रिकेटपटूंना मिळणार संधी

बीसीसीआयकडून लवकरच नवी स्पर्धा
| मुंबई | वृत्तसंस्था |
नवोदित खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊन चांगले खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने बीसीसीआयकडून नवी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा लवकरच होणार आहे. अंडर-23 ऐवजी अंडर-25 अशी स्पर्धा खेळविली जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये काही बदल करुन अधिक स्थानिक क्रिकेटपटूंना प्रथम श्रेणी सामने खेळवण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आयोजित एका मोठ्या बैठकीत भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये अंडर-23 चॅम्पियनशिप जागी अंडर 25 टूर्नामेंट खेळवण्याचा निर्णय झाला. यामुळे अधिक खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळू शकते. अंडर -25 टूर्नामेंट सुरु होताच नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर ही युवा खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान बीसीसीआयने या सर्वावर अजूनपर्यंत कोणताच नेमका निर्णय घेतला नसला तरी लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version