न्यूझीलंडने नोंदवला पहिला विजय

| त्रीनिनाद | वृत्तसंस्था |

आयसीसी टी-20 विश्वचषकात 32 व्या सामन्यात न्यूझीलंड संघाने युगांडा विरुद्ध 9 गडी 88 चेंडू राखून दमदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना युगांडा केवळ 40 धावांवर सर्वबाद झाला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 5.2 षटकात सामना जिंकला. संघाचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने 22 धावांची नाबाद खेळी खेळली. तर, गोलंदाजीत टीम साउथीने भेदक चेंडूचा मारा करत 3 बळी घेतले. त्यासोबतच ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले. न्यूझीलंड आणि युगांडाचे संघ सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने 3 सामने खेळला असून संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे.

दरम्यान, नाणेफेक गमावत पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या युगांडा संघ 18.4 षटकात फक्त 40 धावा करुन सर्वबाद झाला. यादरम्यान रोनक पटेल आणि सायमन सेसाझी सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले. सेसाझी गोल्डन डकवर तंबूत परतला. तर, पटेल 2 धांवावर बाद झाला. संघासाठी सर्वाधिक केनेथ वायस्वाने 11 धावा केल्या. दिनेक नाकराणी 4 धावा करून बाद झाला. कर्णधार मसाबा 3 धावा करुन नाबाद राहिला.

Exit mobile version