एनआयएची धडक कारवाई; ठाण्यात 41 ठिकाणांवर छापे

14 संशयित ताब्यात

। ठाणे । वृत्तसंस्था ।

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएने) दहशतवाद्यांकडून घातपात होण्याच्या शक्यतेनं मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एकूण 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापेमारी केलेली आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर आणि इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर महाराष्ट्रातील कारवाईत एकूण 14 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

आज (दि.09) पहाटे भिवंडीतील पडघा येथे एनआयच्या पथकांनी छापे टाकले. एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 13 जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. या छाप्यांवेळी एनआयएने तब्बल 14 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. छापेमारीदरम्यान एनआयएने काही लोकांकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. हे सर्वजण देशात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होते. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला व अतिफ नाचन यांना पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील पडघा हे गाव एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने पुन्हा छापे टाकून आणखी काहीजणांना ताब्यात घेतले. भिवंडीत सुध्दा एनआयएच्या पथकांकडून कारवाई सुरु आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर व इस्लामपूरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. याशिवाय, कर्नाटक आणि बंगळुरुतही छापेमारी करण्यात आली. तसेच पडघा नजीकच्या बोरिवली गावात एनआयएने कारवाई केलेली आहे. गावातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईवेळी गावात ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.

अटक करण्यात आलेल्यांची नावे
ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु होती. हसीब मुल्ला, मुसाफ मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलीस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर के.पी. या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Exit mobile version