। अलिबाग । वार्ताहर ।
रोहा येथील निडी येथे आदेश पाटील मित्र मंडळ आयोजित निडी प्रिमिअर लीग ही क्रिकेट स्पर्धा 5 व 6 फेब्रुवारी या दोन दिवसात अतिशय उत्साहात संपन्न झाली. साळाव उपसरपंच दिनेश दामु बापलेकर, शेकाप युवक अध्यक्ष मुरूड शरद चवरकर, शेकाप जिल्हा चिटणीस किशोर गायकर यांच्या हस्ते 5 फेब्रुवारी रोजी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर, माजी सरपंच साळाव मधुकर बाळकृष्ण पाटील, भारतीय डाक विभाग सहाय्यक अधिक्षक रायगड सुनिल थळकर, सभापती पंचायत समिती मुरूड रमेश नागांवकर, मुरूड तालुका सहचिटणीस सि. एम. ठाकुर तसेच प्रमुख अतिथी म्हणून अज्ञेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, दिलीप चवरकर, जिल्हा चिटणीस सदस्य शेकाप अशोक चवरकर, माजी सरपंच मिठेखार संतोष चिपळूणकर, विशाल पाटील, रामचंद्र पाटील, नितेश पाटील पोलिस पाटील निडी, भास्कर साळावकर, जगदीश चवरकर, हेमंत पाटील, अनिल बापलेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 6 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये भारतीय सैन्यातील नितेश जनार्दन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेचे सूत्रसंचालन जगदीश चवरकर यांनी केले.







