स्वराज जोगेश्वरी नगर विजयी
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील आंगर आळी येथील जय हनुमान क्रिकेट क्लब यांच्यावतीने नागोठणे क्रिकेट असोसिएशन मर्यादित नाईट बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत स्वराज जोगेश्वरी नगर या संघाने विजेतेपदाची रोख रक्कम व आकर्षक चषक पटकाविला. तर, आर जे स्टार या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत देवलाई चिकणी व ओमसाई खडक आळी या संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर अतुल बामणे, उत्कृष्ट फलंदाज वेदांत देवरे, उत्कृष्ठ गोलंदाज प्रवीण पवार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमेय जोशी यांनाही आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन राहुल ताडकर यांनी केले.
येथील कापुर तळा मैदानावर शनिवारी (दि.27) रात्री घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी शिवसेना उबाठा नेते किशोर जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच सुरेश कामथे, संजय पिंपळे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, संतोष नागोठणेकर, भाविका गिजे, अमृता महाडिक, ज्योती राऊत, शाखाप्रमुख धनंजय जगताप, चंद्रकांत कामथे, अशोक गोरे, अनिल चांदविणकर, चेतन कामथे, कैलास गोरे, मनोज भोसले, अनिल महाडिक, शेखर गोळे, किसन शिर्के, किरण पवार आदींसह अनेक मान्यवर व क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुरेश कामथे, मंदार चितळे, असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर, अल्विन नाकते, भरत गिजे, चेतन कामथे, नरेश भंडारी, सचिन लाड व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रिकेट क्लबचे भरत गीजे, अल्विन नाकते, मयूर शिर्के, ओंकार पिंपळे, अभिजीत मालुसरे, कल्पेश चांदविणकर, रोहन भोसले, मनोज गोरे, मंदार शिर्के, शुभम जाधव, वैभव जाधव आदींसह जय हनुमान क्रिकेट क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी मेहनत घेतली.







