| तळा | वार्ताहर |
एस.एस. निकम इंग्लिश स्कूल तळाचे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अॅड. चेतन चव्हाण यांच्या हस्ते उत्साही व आनंदी वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीची चेअरमन तथा संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी विक्रांत सप्रे हे होते. तर मंचकावर शाळा समिती सदस्य विजय तांबे, पुरुषोत्तम मुळे, मुख्याध्यापक राजेश आगिवले, गुरुजन, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम अॅड. चेतन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन, सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण व क्रीडा ज्योतीचे स्वागत करीत उद्घाटन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवायती, पिरॅमिड्स या माध्यमातून आपल्या कलेचे सादरीकरण करण्यात आले. याच वेळी तालुका क्रीडा स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले, त्यांचा गौरव व अभिनंदन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अॅड. चेतन चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना स्वतः जिंकण्यासाठी खेळायचे असते, दुसर्याला हरवण्यासाठी नाही खेळायचे, अनेक नामांकित खेळाडूंची नावे सांगून खेळात सातत्य टिकविले तर उज्ज्वल यश प्राप्त करता येते. त्याद्वारे शाळेचे, आपले, गावाचे नाव रोशन करता येते. खेळातून आपले आरोग्य सुदृढ राहते, निरोगी राहते. शालेय जीवनात कवायती करतानाची आज आठवण झाली. सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देताना उत्तम खेळा, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बंगाळे मॅडम यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. पाटील यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.