| रसायनी | वार्ताहर |
चौक विभागातील ग्रुप ग्रामपंचायत टेंभरीच्या उपसरपंचपदी उध्दव शिवसेनेचे निखिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी महाविकास आघाडीकडून निखिल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकार्यांनी टेंभरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निखिल पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी राजिप सदस्य मोतीराम ठोंबरे, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांचे स्वीय सहाय्यक सौरभ भडसावळे यांनी निखिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत चौकचे माजी उपसरपंच राजन गावडे, अजिंक्य देशमुख आणि विकास गावडे आदी उपस्थित होते.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.







