निलेश पाटील कृषी पर्यवेक्षक परीक्षा उत्तीर्ण

| खोपोली | प्रतिंनीध |

कृषी सहाय्यक या पदावर गेली 10 वर्ष काम करणारे निलेश पाटील यांनी खाते अंतर्गत असलेल्या वरिष्ठ पदासाठी परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते यशस्वी झाले असून त्यांना आता कृषी पर्यवेक्षक या पदावर काम करावे लागणार आहे.

खालापूर तालुक्यातील कृषी विभागातील शेतकर्‍यांचे मित्र म्हणून पाटील यांची ओळख आहे. खालापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना संघटीत करून त्यांच्याकडून दर्जेदार शेती व्यवसाय करून घेण्यात पाटील हे यशस्वी ठरले होते. आपल्या अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ते सतत आपल्या कामात व्यस्त असायचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या त्यांचे वडील खरिवली ग्राम पंचायतीचे आदर्श सरपंच म्हणून ओळखले जातात. आपल्या मुलाला कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला खर्‍या अर्थाने यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version