माथेरानमध्ये दोन दिवसात नऊ जणांना श्‍वानदंश

| माथेरान । वार्ताहर ।
पिसाळलेल्या श्‍वानांनी दोन दिवसात नऊ जणांना चावा घेतल्याने शहरातील नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी आठ जणांना तर मंगळवारी एकाला कुत्रा चावल्याची घटना घडली.शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून पिसाळलेला कुत्र्याने भटक्या कुत्र्यांनाही जखमी केले आहे. मुख्य बाजारपेठे, रेल्वे स्थानकात दिवसरात्र कुत्र्यांचा हैदोस सुरू असतो. महिनाभरात श्‍वान दंशाच्या अनेक घटना समोर आल्याने नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना करून निर्बिजीकरणावर भर दिला असून बाहेरून डॉक्टर बोलावून निर्बिजीकरण करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे -शिंदे यांनी सांगितले.

बाजार पेठ येथे एका महिलेला पिसाळलेल्या श्‍वान चावल्यामुळे तिने तावडीतून सुटून पळ काढला. मात्र तोल जाऊन पडल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. माथेरान शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेली असता, हातावर प्राथमिक उपचार करण्यात आले. श्‍वानदंशामुळे पायाला गंभीर जखम झाल्याने अँटीरेबीज इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले.

महिलेचा हाताला दुखापत
बाजारपेठेत एका महिलेला पिसाळलेल्या श्‍वानाने चावल्यामुळे तिने तावडीतून सुटूण्यासाठी पळ काढण्याच्या तयारीत असताना तोल जाऊन पडून तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.ती माथेरान शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली असता.हातावर प्राथमिक उपचार करून तसेच चावलेल्या पायाची जखम मोठी असल्याने अँटीरेबिज इंजेक्शन देऊन हाताच्या आणि पायाच्या पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले.

भाद्रपद महिना हा श्‍वानांच्या वीण संबंधांचा असतो. जास्त नर एकत्र आल्यास त्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे सैरभैर होऊन ते सुरुवातीला इतर श्‍वानांना चावतात व नंतर ते माणसावर सुद्धा हल्ला करतात. यासाठी त्यांचे निर्बीजीकरण होणे आवश्यक आहे.

– अमोल कांबळे, पशुधन विकास अधिकारी

गेल्या महिन्यात श्‍वानांचे निर्बिजीकरण केले होते. आता पुन्हा हालचाली सुरू केल्या असून खासगी डॉक्टरांना बोलावून निर्बिजीकरण केले जाणार आहे.

– सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी
Exit mobile version