निरजच्या रौप्य पदकाचा परिणाम

भारतीयांना मिळणार मोफत व्हिसा

| पॅरिस | वृत्‍तसंस्था |

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. ज्यामुळे संपूर्ण देशातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीवर भारतीयांना देखील आनंद व्यक्त केला आहे. आता अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने सर्व भारतीयांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ऍटलिझचे संस्थापक आणि सीईओ मोहक नाहाटा यांनी जाहीर केले होते की, जर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले तर ते सर्व भारतीयांना मोफत व्हिसा देणार आहेत.

कंपनीच्या सीईओने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते की जर भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले तर त्यांची कंपनी वैयक्तिकरित्या सर्वांना मोफत व्हिसा पाठवणार आहे. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले नसले तरी त्याने रौप्यपदक जिंकले आहे. पण असे असले तरी कंपनीने दिलेले वचन पाळणार असल्याचे म्हटले आहे.

कंपनीच्या सीईओंनी काय घोषणा केली? स्टार्टअपच्या सीईओने लिंक्डइनवरील पोस्टमध्ये सांगितले की, मी नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास मोफत व्हिसा देण्याचे वचन दिले होते. पण आज मला सांगायचे आहे की पदकाचा रंग नसून ती भावना महत्त्वाची आहे. रौप्यपदक जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, मी आज सर्व भारतीयांसाठी मोफत व्हिसाची आमची मूळ ऑफर वाढवत आहे. हा उपक्रम केवळ चोप्रा यांच्या कामगिरीबद्दलचा उत्साहच दर्शवत नाही, तर राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचा उत्सवही आहे. जगभरातील कोणत्याही देशासाठी मोफत व्हिसा मोफत असेल, पण तो फक्त एका दिवसासाठी म्हणजेच आजचा असेल.

या रोमांचक ऑफरच्या घोषणेनंतर, ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्यांची संख्या 124% पेक्षा जास्त वाढली आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या युजर्सची संख्या दुप्पट झाली आहे. सेवा शुल्कही माफ केले कंपनीने सांगितले की सर्व्हिस चार्ज आणि व्हिसाचा खर्च दोन्ही शुल्क सर्व भारतीयांसाठी माफ करण्यात आले आहे. भारतीयांना कोणतेही पैसे न देता व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जात आहे. भारताच्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकमध्ये 89.45 मीटर अंतरावर भाला फेकून रौप्य पदक जिंकले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी भालाफेकपटू अरश नदीमने गुरुवारी स्टेड डी फ्रान्स येथे पॅरिस 2024 ऑलिम्पिक फायनलमध्ये 92.97 मीटरवर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम मोडून जगाला चकित केले आहे.

Exit mobile version