। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सीबीआयनं इजिप्तच्या कैरोमध्ये मोठी कारवाई केली आहे. बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जवळचा सहकारी सुभाष शंकर याला इजिप्तमधील कैरोमध्ये पकडण्यात आले आहे. त्याला इजिप्तमधून मुंबईत आणण्यात सीबीआयला यश आले आहे. नीरव मोदीशी संबंधित पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुभाष हा नीरव मोदीच्या एका कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करत होता.