चौल येथील अध्यात्मिक गुरू वार्डे गुरुजी यांचे निर्वाण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
चौल येथील अध्यात्मिक गुरू नारायण वार्डे तथा वार्डे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निर्वाण झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, एक मुलगी, 4 सुना ,नातवंडे आणि पणतू असा मोठा परिवार आहे. शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांचे ते आजोबा होते. वार्डे गुरुजी म्हणून सुपरिचित असलेल्या गुरुजींनी 50 वर्षे अध्यात्मिक सेवा केली. त्यांच्या पाठीमागे शेकडो लोकांचा नवनाथ परिवार आहे. त्यांनी नवनाथ दरबार च्या माध्यमातून अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या. निरपेक्ष सेवा, कोणाकडून सेवेबद्दल आयुष्यात एकही रुपया घेतला नाही. महाराष्ट्रातून ,महाराष्ट्राबाहेरून अनेक लोक आपली समस्या घेऊन यायचे. अध्यात्मिक सेवेसोबत सामाजिक सेवा सुद्धा केली अनेक आजारांवर वनस्पती औषध सुद्धा द्यायचे शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि मुख्याध्यापक म्हणून रेवदंडा येथून निवृत्त त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नाने आणि बचुभाई मुकादम यांच्या मदतीने शाळेची इमारत बांधली गेली रेवदंडा शाळा झेडपी आदर्श शिक्षक पुरस्कार तसे रायगड भूषण पुरस्कार यांनी सन्मानित 2 महिन्यापूर्वीं त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. दत्त मंदिर येथे दत्तमठ बांधून हजारो लोकांना अन्नदान केले.

Exit mobile version