बीपीसीएलला निर्वाणीचा इशारा

| रसायनी | वार्ताहर |
देशाचा विकास व्हावा याला आमचा विरोध नाही परंतु विकासाच्या पायाखाली शेतकर्‍यांचा बळी देऊ नये. शेतकर्‍यांना भूमीहीन करून मजबूर आणि मजदुर बनविणा-या व्यवस्थेला आमचा विरोध आहे.येत्या दहा दिवसांच्या आत बीपीसीएल कंपनी प्रशासनाने येथील कामगारांना घेतले नाही.कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला.

देशभरात आणि रायगड जिल्हयात शेतकर्‍यांची जमीन अनेक प्रकल्पांच्या नावाखाली काढून घेवून शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे.शेतक-यांच्या जमिनीवर प्रकल्प उभे केले परंतु शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला नाही.त्यांना नोक-यांमध्ये प्राथमिकता न देता कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करून राजरोसपणे शेतकर्‍यांची पिळवणूक करण्यात येत आहे. यावेळी वामन मेश्राम म्हणाले की येथील सत्ताधार्‍यांनी कामगारांना, शेतकर्‍यांना,मजुरांना नेहमी उपेक्षित ठेवले. त्यांच्या सेवा सुविधेकडे दुर्लक्ष केले. आता मात्र या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या 10 दिवसाच्या आत येथील बीपीसीएल कंपनी प्रशासनाने उर्वरित कामगारांना कामावर घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनसाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता पासूनच कामाला लागा आणि आपली ताकद सर्वांना दाखवून दया. असे आवाहन पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी सत्ताधारी व कंपनी प्रशासनाला वामन मेश्राम यांनी जाहीर खुले आव्हानच दिले. खुले आव्हान देऊन सदर 10 दिवसाच्या आत सोडविण्याची मागणी केली. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नेहमी कामगारांच्या, शेतकर्‍यांच्या, मजुरांच्या पाठीशी असेल असे ग्वाही वामन मेश्राम यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ सुभाष घरत यांनी केले.यावेळी एल बी पाटील, अ‍ॅड मच्छिंद्र घरत,धर्मा जाधव,अ‍ॅड प्रकाश शिंदे, विजय आवासकर, मधुकर म्हात्रे, मनोज महाले मार्गदर्शन केले.सभेची प्रस्तावना कामगार नेते मनोज रामधरणे यांनी केले.तर आभार किरण अनंता घरत यांनी मानले.

Exit mobile version