| उरण | वार्ताहर |
नेचर फ्रेन्ड सोसायटी पनवेलतर्फे साहस व निसर्ग शिबीर शांतिवन नेरे, पनवेल येथे दि.17 व 18 रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात वरळी, मुंबई, जुईनगर, खारघर, उरण, पनवेल तसेच इतर गावांतील एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसीय शिबिरामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन- प्रात्याक्षिक, चमत्कारा मागील विज्ञान, आपत्कालीन स्वसंरक्षण प्रात्याक्षिक, सर्प विज्ञान व कलाकौशल्य प्रदर्शन, नेचर ट्रेल व पक्षी निरीक्षण, सस्तनप्राणी माहितीपट, निसर्ग खेळ, साहसी खेळ आदीचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात उल्हास ठाकूर, निखिल भोपळे, कृपा पाटील, जया पादले, अशोक निकम, सुरेश गीध, नितीश पाटील, निळकंठ कोळी व संतोष उदरे, ममिता उदरे, विघ्नेश पाटील, आर्यन उदरे, आरती घोगरे, नेहा गोरे, संचया म्हसकर, संजना म्हसकर, सिद्धी म्हसकर, श्रावणी मोकल, आरती जैस्वाल, संदेश पवार, प्रतीक शेंदरे, प्रमोद पाटील, दिपक उदरे, संदीप भगत आणि लोकेश फडके यांनी मोलाची कामगीरी बजावली. संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांनी आभार मानले.







