आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्यपदी नीता अंबानी

| मुंबई | वृत्तसंस्था |

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा, मुंबई इंडियन्सच्या मालक आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी जगभरात लोकप्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी त्यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे या निवडीसाठी त्यांना शंभर टक्के राष्ट्रांचा म्हणजे सर्वच्या सर्व 93 मतांचा पाठिंबा मिळाला. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य त्या बनल्या आहेत. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांना पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे सदस्य बनवण्यात आले होते. या प्रकारे 8 वर्षांनंतर त्यांना दुसर्‍यांदा हा सन्मान मिळाला आहे.

रिलायन्स फाउंडेशनने या सन्मानाची माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. मी अध्यक्ष थॉमस बाख आणि आंतरराष्ट्रीय ऑल्मिपक संघटनेमधील माझ्या सर्व सहकार्‍यांचे माझ्यावर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल आभार मानते. ही निवडणूक केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण मी प्रत्येक भारतीयासोबत शेअर करतो. भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

Exit mobile version