| मुंबई | प्रतिनिधी |
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीमार्फत सुरु आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार असून, दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली आहे.