| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील वाघोबा मित्रमंडळ नांदगाव कोळीवाड्याने होळी सणानिमित्त आयोजित केलेल्या बोट (नौका) स्पर्धेत नांदगावच्या नितेश रावजी यांच्या बोटीने प्रथम क्रमांक पटकावला. नांदगाव समुद्र किनारी रविवारी सकाळी बोटींच्या स्पर्धेचा थरार पहायला मिळाला.तीन खलाशी असलेल्या सुमारे दहा बोटींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. नांदगाव कोळीवाड्या लगतच्या खाडीतून या स्पर्धेला प्रारंभ झाला. अटीतटीच्या या लढतीत नितेश रावजी यांच्या बोटीने अखेर बाजी मारली. व प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. चंद्रकांत देवकर यांच्या बोटीला दुसरा क्रमांक मिळाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाघोबा मित्रमंडळाच्या अजय अग्रावकर, दिगंबर पाटील, वृषभ तरे व अन्य सदस्यांनी मोठे सहकार्य केले. स्पर्धा पाहायला यशवंतनगर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.





