नित्याने जिंकले कांस्यपदक

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

भारताची बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले आहे. महिलांच्या सिंगल एसएच 6 इव्हेंटमध्ये नित्याने इंडोनेशियाच्या रिना मार्लिना हिचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे रिना हिने 2022 मध्ये जागतीक अजिंक्यपदमध्ये सुवर्ण पदक पटकवले होते.

नित्याने सुरावातीपासूनच खेळावर पकड मजबूत केली होती. स्ट्रेट गेममध्ये 21-14 आणि 21-6 अशा फरकाने तिने पकदावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे तिने सामना जिंकण्यासाठी फक्त 23 मिनिटांचा वेळ घेतला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नित्या श्री सिवन हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षा तिने सार्थ ठरवली आहे. नित्याने पहिल्या गेममध्ये 21-14 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये तिने 21-6 अशा फरकाने रिनाला पराभव दाखवला. नित्याकडे 14 कांस्यपदक गुण होते. पदक घरी घेऊन जाण्यासाठी तिला फक्त एका गुणाची आवश्यकता होती. भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील हे पाचवे पदक ठरले आहे. भारतीय खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.

Exit mobile version