देशपांडे चेस ॲकॅडमी प्रथम
| माणगाव | वार्ताहर |
नागोठणे येथे रिलायन्स कंपनी नागोठणेतर्फे 11 वर्षाखालील, 15 वर्षाखालील व खुल्या अशा तीन गटातील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशपांडे चेस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेत देशपांडे चेस ॲकॅडमीचा विद्यार्थी आयांश टेंबे याचा 11 वर्षाखालील मुख्य गटात प्रथम क्रमांक आला तर सर्व तेजस जाधव, चैत्र शेठ, स्वर पटेल, अंश पवार, मल्हार करंजकर, ईशान कराडे, आदित्य भोस्तेकर, रियान पठाणी, वेद भोकरे, यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा ,सहावा, सातवा, आठवा, नववा व दहावा क्रमांक प्राप्त केला. तर मुलींमधून अकरा वर्षाखालील वयोगटात अथर्वा घरात, ओजस्वी थळे, सान्वी म्हात्रे, सांची नागोरे, हर्षिता ढवळे यांनी अनुक्रमे पहिला दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक प्राप्त केला. 15 वर्षाखालील वयोगटात मुलींमधून ऋतुजा नेटक, आर्या जाधव, मैथिली देशमुख, शिफा शेख व वैदेही तेठगुरे यांनी अनुक्रमे पहिला दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. पंधरा वर्षाखालील मुख्य गटातून ओम चव्हाण, श्रव्य गावंड, अथर्व वाघ, हर्षवर्धन भिंगे, गौतम पवार यांनी अनुक्रमे पहिला दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. खुल्या वयोगटातून ललितादित्यनार भूमीनाथनय, विशाल धारिया, यश कपाडी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला.
या स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेला हर्ष कासरेकर याला यंगेस्ट प्लेयर म्हणून बक्षीस देऊन गौरविण्यात आले तर मानस पेंडसे, विहान बागदे यांना उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धेत देशपांडे चेस ॲकॅडमीच्या बारा जणांनी बक्षीस प्राप्त करत स्पर्धेवर आपले वर्चस्व ठेवले. अजिंक्य पिंगळे यांनी या स्पर्धेची मुख्य पंच म्हणून उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुनील घोलप, आर. डी. जाधव, विक्रम शेट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.