| रसायनी | प्रतिनिधी |
नवी मुंबई महानगरपालिकेने प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना काळामध्ये वाशिवली (रसायनी) ते सीबीडी बेलापूर बससेवा सुरू केली आहे. वाशिवली येथून वळून बेलापूरकडे जात असताना वाशिवली येथे रामा कंपनीजवळ एनएमएमटीचे वाहन चालक यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलप्पा यशवंत पुजारी (39) हे आपल्या ताब्यातील बस वाशिवली गाव अशी घेऊन रामा कंपनीकडे वळवण्यासाठी गेले होते. यावेळी भास्कर पाटील व संतोष थोरवे यांनी बस चालकास दमदाटी करत ही जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे येथे बस वळवायची नाही, असे बोलून शिवीगाळ केली. भास्कर पाटील यांनी हातात असलेल्या काठीने मलप्पा पुजारी यांच्या उजव्या हाताला मारून दुखापत केली. तर, संतोष थोरवे यांनी बसच्या दरवाजाच्या आतमध्ये जाऊन शिवीगाळ करून हाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रसायनीचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा पवार अधिक तपास करीत आहेत.






