उरणला एनएमएमटीची बससेवा सुरू

। उरण । वार्ताहर ।

उरणमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली एनएमएमटी बससेवा पुन्हा बुधावारपासून कार्यान्वित होत आहे. उरण तालुक्यातील खोपटे गावाजवळ एनएमएमटीच्या भरधाव बसचा अपघात झाला होता.

या अपघातामध्ये येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या नातेवाइकांना एनएमएमटीमध्ये नोकरी आणि नुकसानभरपाईची मागणी केली होती; मात्र एनएमएमटी प्रशासनाने या मागणीची पूर्तता न केल्यामुळे फेब्रुवारीपासून ही सेवा बंद होती. उरण तालुक्यात कोपरखैरणे ते उरण, कळंबोली ते उरण, जुईनगर ते वशेणी अशी सेवा सुरू होती. मात्र गेल्या आठ महिन्यांपूर्वी खोपटे येथे एनएमएमटी बसच्या अपघातात येथील नीलेश म्हात्रे याचा मृत्यू झाला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या मार्गावर बस बंद होती. या मार्गावर दिवसभरात सुमारे 7,000 हून अधिक प्रवासी प्रवास करतात; मात्र एनएमएमटीची सेवा बंद झाल्याने या प्रवाशांचे हाल होत होते.

त्यात प्रवाशांना टॅक्सी, कार, रिक्षा अशा वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागत होता. त्यामुळे उरण मार्गावर पुन्हा एनएमएमटीने बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत होती. या मागणीचा विचार करत अखेर एनएमएमटी प्रशासनाने उरण मार्गावर पुन्हा बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.या मार्गावर धावणार एनएमएमटी रोडपाली- कळंबोली ते उरण, 31 कोपरखैरणे ते उरण या मार्गावर बुधावारपासून एनएमएमटी बससेवा सुरू होत आहे; मात्र ज्या मार्गावर एनएमएमटी बसचा अपघात झाला होता. त्या मार्गावरील सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहणार आहेत.

Exit mobile version