अवैध ब्लास्टिंगवर अद्याप कारवाई नाही

| पेण | प्रतिनिधी |

काराव गावाच्या शेजारी जेएसडब्ल्यू कंपनीचे गृहनिर्माण वसाहतीचे काम सुरु असून, मे महिन्याच्या चौथ्या आठवडयात बिनापरवाना ब्लास्टिंग करण्यात आले होते. यावेळी पोलीसांच्या मध्यस्थिने स्थानिकांनी ब्लास्टिंग तात्पुर्ते बंद करण्यात आले होते. यानंतर 27 मे रोजी तहसीलदारांनी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करून येत्या आठ दिवसांच्या आत ब्लास्टिंग केलेल्या जागेचा पंचनामा करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द स्थानिकांना दिला होता. परंतु, जवळपास महिन्याभराचा कालावधी उलटून गेला तरीदेखील महसूल खात्याकडून अवैध ब्लास्टिंग करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात आलेली नाही. ही कारवाई न होण्यामागे कंपनी प्रशासनाचा हात तर नाही ना, अशी चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये होत आहे. तसेच ब्लास्टिंगविरूध्द आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना कंपनीविरूध्द बोललात तर तुमच्या नातेवाईकांना कामावरून काढून टाकू, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांचे कंपनी प्रशासनाकडून तोंड बंद केले जात असल्याच्या उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version